Third Wave of Corona : याच महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये शिखरावर, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

Third Wave of Corona in India along with Maharashtra and Kerala will start from August and its peak will be on October a study

Third Wave of Corona : देशात कोरोनाची तिसरी लाट याच महिन्यात सुरू होऊ शकते, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल. यात अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे की, या लाटेमध्ये दररोज एक लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. जेव्हा तिसऱ्या लाटेत परिस्थिती अधिक गंभीर होईल, तेव्हा हा आकडा दररोज 1.5 लाखांपर्यंत वाढेल. Third Wave of Corona in India along with Maharashtra and Kerala will start from August and its peak will be on October a study


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात कोरोनाची तिसरी लाट याच महिन्यात सुरू होऊ शकते, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल. यात अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे की, या लाटेमध्ये दररोज एक लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. जेव्हा तिसऱ्या लाटेत परिस्थिती अधिक गंभीर होईल, तेव्हा हा आकडा दररोज 1.5 लाखांपर्यंत वाढेल.

आयआयटी हैदराबाद आणि कानपूरचे मथुकुमल्ली विद्यासागर आणि मणिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. यानुसार तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये टाक गाठेल आणि कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढेल. ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीनुसार विद्यासागर यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र आणि केरळसाठी धोक्याची घंटा

या अहवालात विद्यासागर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि केरळमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. त्यांनी या दोन राज्यांसाठी ‘अलार्म बेल’ सारखे शब्द वापरले आहेत. परंतु या अहवालात दिलासा देणारी बाब म्हणजे, यामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे वर्णन दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असल्याचे करण्यात आले आहे.

या वर्षी मे महिन्यात आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक विद्यासागर यांनी भारतात कोरोना विषाणूच्या प्रसारावर एक संशोधन प्रसिद्ध केले. त्यांच्या गणितीय मॉडेलवर आधारित, त्यांनी मे महिन्यात रुग्णांची संख्या वाढण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, मे महिन्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढेल आणि जूनपर्यंत ही संख्या दररोज 20 हजारांच्या जवळ पोहचण्यास सुरुवात होईल. त्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले होते की, 3 ते 5 मेदरम्यान कोरोना शिगेला पोहोचेल. त्यांनी इंडिया टुडेला 7 मे रोजी कोरोनाच्या शिखराची तारीख सांगितली होती. पण विद्यासागरच्या टीमचा हा अंदाज चुकीचा ठरला. याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले होते की चुकीच्या मापन पद्धतीमुळे अंदाज चुकीचा असल्याचे सिद्ध झाले.

महाराष्ट्र, केरळसह 10 राज्यांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 40,134 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 422 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील राज्यांसह 10 राज्यांमध्ये अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. या राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने त्यांना रोखण्याच्या उपायांवर कठोरपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Third Wave of Corona in India along with Maharashtra and Kerala will start from August and its peak will be on October a study

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात