धक्कादायक : चोरट्यांनी कोरोनाची लस समजून पोलिओचेच डोस पळवले, कल्याण ग्रामीणमधील घटना

Thieves Stolen Polio Vaccine instead Of Corona Vaccine in Kalyan Rural

Corona Vaccine : देशात आणि राज्यात सगळीकडे लसीकरण सुरू आहे. परंतु सध्या तुटवडा असल्याने लसींना प्रचंड महत्त्व आले आहे. लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावरून माघारी जावे लागत आहे. यामुळे मिळेल त्या मार्गाने लसीचे डोस घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. कल्याणमध्ये चोरट्यांनी मात्र कोरोनावरील लसीऐवजी चुकून पोलिओचेच डोस नेल्याचं समोर आलं आहे. Thieves Stolen Polio Vaccine instead Of Corona Vaccine in Kalyan Rural


विशेष प्रतिनिधी

कल्याण : देशात आणि राज्यात सगळीकडे लसीकरण सुरू आहे. परंतु सध्या तुटवडा असल्याने लसींना प्रचंड महत्त्व आले आहे. लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावरून माघारी जावे लागत आहे. यामुळे मिळेल त्या मार्गाने लसीचे डोस घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. कल्याणमध्ये चोरट्यांनी मात्र कोरोनावरील लसीऐवजी चुकून पोलिओचेच डोस नेल्याचं समोर आलं आहे.

मलंगगड परिसरातील मांगरूळ आरोग्य केंद्रात चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून प्रवेश केला. चोरांनी कोरोनाची लस समजून पोलिओचेच डोस लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि टीव्हीसुद्धा यावेळी चोरून नेला. या घटनेमुळे आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिललाईन पोलिसांनी तपासला याप्रकरणी नोंद घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चव्हाण म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र मांगरूळ येथे चोरट्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला व लस चोरून नेल्या. परंतु त्या लस कोरोनाच्या नव्हत्या तर पोलिओच्या होत्या. याबाबत आम्ही पोलिसांना माहिती दिली आहे. याशिवाय लस परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Thieves Stolen Polio Vaccine instead Of Corona Vaccine in Kalyan Rural

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात