‘ते सगळेच ड्रामा बघतायेत ‘ मिका सिंगने आर्यन खान प्रकरणात दिली प्रतिक्रिया


आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुलाला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’They all watch dramas’ Mika Singh responds in Aryan Khan case


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटक झाली. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुलाला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आर्यनला पाठिंबा दिला आहे.अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेता हृतिक रोशन पाठोपाठ आता मिका सिंगने आर्यन आणि शाहरुखला पाठिंबा देत ट्वीट केले आहे.मिका सिंगने संजय गुप्ता यांच बोलणं खरं असल्याचं ट्विट केलंय. त्याने आर्यनला पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाला मिका सिंग

संजय गुप्ताच्या या ट्विटला मिका सिंगने रिट्विट करत लिहिले, ‘तुम्ही अगदी बरोबर आहात. ते सर्व नाटक पाहत आहेत आणि एक शब्दही उच्चारत नाहीत. मी शाहरुख खानसोबत आहे. आर्यन खानला जामीन मिळावा. मला वाटतं इंडस्ट्रीतील प्रत्येकाच्या मुलाने एकदा आत जाव, मग ते ऐक्य दाखवतील.

संजय गुप्ता यांच ट्विट काय होत

शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कार्यासाठी तो नेहमीच मदत करत असतो. आणि आज त्याच इंडस्ट्रीमधील लोक त्याच्या कठीण काळात मौन बाळगून आहेत. हे किती लज्जास्पद आहे या आशयाचे ट्वीट संजय गुप्ता यांनी केले आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये संजय यांनी लिहिले – आज त्याचा मुलगा आहे. उद्या माझा असेल किंवा तुमचा. तरीही हा मूर्खपणा करून गप्प बसणार का?

‘They all watch dramas’ Mika Singh responds in Aryan Khan case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती