या सेवा व कार्यालयांना वगळले आहे अप्रत्यक्ष लॉकडाऊनमधून…


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फक्त त्यात लॉकडाऊन म्हणण्याऐवजी त्यांनी १४४ कलम संचारबंदीचे कडक निर्बंध म्हटले आहे. मात्र तातडीच्या व आवश्यक सेवा कोणत्या असतील, याचीही सविस्तर यादी सरकारने जाहीर केलेली आहे. These services and offices are excluded from indirect lockdown

पुढील वस्तू सेवा विक्री केंद्रे कार्यालय यांना या अप्रत्यक्ष लॉकडाऊन मधून वगळले आहे..

रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसी, फार्मा कंपन्यांचे उत्पादन आणि वितरण युनिटला सहाय्य करणा-या वाहतूक आणि पुरवठा साखळी. लस, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट्स, त्यांचे सहाय्य सेवा, उत्पादन आणि वितरण

जनावरांचे रूग्णालय व सेवा,  पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने,  ,किराणा सामान,  भाजीपाला, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने, कोल्ड स्टोरेज , गोदाम सेवा,
सार्वजनिक वाहतूक: विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो, बसेस
देशांच्या #Diplomat कार्यालयाशी संबंधित सेवा, #RBI आणि RBI ने आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा,
#SEBI ची सर्व कार्यालये, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन, मान्सून पूर्व सेवा/कर्मचारी, दूरसंचार सेवा, दूरसंचार दुरूस्त करणारी आवश्यक सेवा, आवश्यक वस्तू वाहतूक, पाणीपुरवठा सेवा, शेती संबंधी उपकरणे/दुरूस्ती, बियाणे / खते, ई-कॉमर्स (आवश्यक वस्तू), पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधित उत्पादने, किनारपट्टी उत्पादनासह, सर्व कार्गो सेवा, पायाभूत सुविधा आणि संबंधित डेटा सेंटर, क्लाउड सर्व्हिसेस, IT सेवा, आयात / निर्यात, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, इलेक्ट्रिक व गॅस पुरवठा सेवा, #ATM, पोस्टल सर्व्हिसेस, बंदरे व त्यासंबंधी उपक्रम, कस्टम हाऊस एजंट्स, लस हस्तांतरण साठी ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
अत्यावश्यक औषधे, फार्मास्युटिकल उत्पादने, आवश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन

 

These services and offices are excluded from indirect lockdown


विशेष बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण