विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : स्थायी विकास मॉडलची गरज व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीत हे खूप महत्वाचं आहे की, अत्यंत वेगाने रोजगारांची निर्मिती व्हायला हवी, असे संघाने म्हटले आहे.The need for a sustainable development model, passed a resolution on the issue of unemployment in the meeting of the RSS
यावेळी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासहीत १२०० पदाधिकारी उपस्थित होते.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे याबाबत माहिती देताना म्हणाले की ,आम्ही प्रस्ताव पारित केलेला आहे. आम्हाला भारतीय जनतेच्या सामथ्यार्ची कल्पना आहे. आम्हाला माहीत आहे की, आत्मनिर्भर कसे व्हायचे.
मात्र, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शेती आणि हस्तोद्योगाच्या माध्यमातून देशात रोजगार निर्माण केला जाऊ शकतो. संघाने प्रस्तावात रोजगारनिर्मितीसाठी भारतीयत्वावर आधारित आर्थिक निती लागू करण्याची चर्चा केली आहे. आम्ही संकटकाळी कोणती आव्हाने उभी राहतात ते पाहिलेले आहे.
अशा परिस्थितीत स्थायी विकास मॉडेलची गरज आहे. आमची इच्छा आहे की, विद्यापीठ, लहान उद्योग आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन या बेरोजगारीच्या प्रश्नाला दूर करण्याचा प्रयत्न करावा.संघाने सरकार आणि समाजाला आवाहन केले आहे की, एकत्र येऊन आर्थिक मॉडेल तयार करायला हवे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. कोरोना महामारीमुळे लोकांच्या उदर-निवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निकालात काढणं गरजेचं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App