राष्ट्रवादीच उतरली नंबर 1 च्या स्पर्धेत; पण खरी स्पर्धा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मागे टाकण्याचीच!!

विनायक ढेरे

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात नंबर एकच्या स्पर्धेत उतरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बाकीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीची महत्वाकांक्षा बोलून दाखवली. The NCP came down in the No. 1 contest; But the real competition is to overtake Shiv Sena Thackeray group and Congress

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर पहिल्या नंबरचा पक्ष बनेल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या 105 आमदारांपैकी 50 आमदार आमचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जिथे ताकद असेल तिथे बाकी कोणाची मदत न घेता राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणावा, असे आवाहन केले.

मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्रातील नंबर 1 ची स्पर्धा ही भाजपबरोबर होण्यापेक्षा महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच रंगण्याची दाट शक्यता आहे. सत्तांतर होण्यापूर्वी महाविकास आघाडीत शिवसेना 1 नंबरचा पक्ष होता. 2 नंबरला राष्ट्रवादी होती आणि 3 नंबरला काँग्रेस होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसने नंबर 1 ची महत्त्वाकांक्षा धरल्याने भाजपबरोबर स्पर्धेत येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थाने शिवसेना आणि काँग्रेस त्यातही शिवसेनेतला ठाकरे गट यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला खरा नंबर कळून येईल.



अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नंबर एकच्या स्पर्धेची महत्त्वकांक्षा बोलून दाखवणे स्वाभाविक मानले पाहिजे. परंतु राष्ट्रवादीचा इतिहास लक्षात घेतला तर 72 आमदार हा राष्ट्रवादीचा टॉपचा आकडा आहे त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सातत्याने राष्ट्रवादीचा आकडा घटलेला दिसला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर शिवसेना आणि भाजप यांची ताकद एकवटल्यानंतर उरलेल्या राजकीय स्पेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने नंबर एकच्या स्पर्धेत उतरू शकते आणि खरच त्याचा परिणाम किती दिसू शकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणं केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन अजित पवारांनी केले.

राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची आपली तयारी असायला हवी. आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्यात तसेच जिथे आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता जागा लढवावी, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १५ वर्षे काँग्रेससोबत संसार केला. मात्र त्यातही काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवण्याची भूमिकाही घेतली. यातून केवळ समोरील विरोधकांचा पराभव झाला पाहिजे ही भूमिका होती. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यांची भूमिका लवकरच मांडण्यात येईल. पण भाजपाचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याची जिथे गरज असेल तिथे तशी भूमिका घ्यायची, असे ते म्हणाले.

अधिवेशन काळात पक्षाच्यावतीने विधानसभेत आक्रमक भूमिका मांडण्याचे काम निश्चितपणे होईल. जिथे सत्ताधारी चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू आणि जिथे योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही, अशी ग्वाही अजितदादांनी दिली.

The NCP came down in the No. 1 contest; But the real competition is to overtake Shiv Sena Thackeray group and Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात