प्रतिनिधी
बुलढाणा : आर्यन खान, नवाब मलिक आणि समीर वानखेडे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील परखड मते व्यक्त केली आहेत. नवाब मलिक यांनी आपली आणि आपल्या जावयाची सगळी पार्श्वभूमी तपासून मग इतरांवर बोलावे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे भाष्य त्यांनी महाराष्ट्रातल्या मीडिया संदर्भात केले. the media stand for? Corrupt? Or those who dig up corruption ?; Narayan Rane’s tough question
मीडियाने नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे? भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या? की भ्रष्टाचार उकरून काढणाऱ्यांच्या?, याचा विचार केला पाहिजे, असे परखड बोल त्यांनी प्रसार माध्यमांना ऐकविले.
महाराष्ट्रात एकेका मंत्र्याकडे 24 – 24 हजार कोटी रुपये सापडतात. ते त्यांनी कोणत्या व्यवसायातून कमवले आहेत का?, त्यांच्याकडे सोर्स काय आहे?, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची? त्यांनी भ्रष्टाचार करून ते पैसे कमावले आहेत ना?, असे एकापाठोपाठ एक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केले.
छगन भुजबळ हे काय पंढरपूरच्या तीर्थयात्रेला गेले होते, म्हणून त्यांना अटक झाली का?, असा खोचक सवालही नारायण राणे यांनी या वेळी केला. नवाब मलिक यांनी भाजपवर तोफ डागत असताना हिवाळी अधिवेशनात भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर करून त्यांना पळता भूई थोडी करण्याचा इशारा दिला आहे.
त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, की कसले अधिवेशन?, कोणाचे अधिवेशन? तिथे काय फाशी देता येते का आणि तिथे भाजपचे 105 आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत. ते काय महाविकास आघाडीला सोडतील का?, अशी परखड टीका देखील नारायण राणे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App