काल राऊतांची “भ”काराची भाषा; आज भातखळकरांची “गटाराची” भाषा; दोघांचाही स्तर घसरलेलाच!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत “बाप”, “गांडू”, “दलाल”, “भडवा” हे शब्द वापरून आपला खाली गेलेला स्तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवून घेतला. पण संजय राऊत यांची शिवराळ संस्कृती असू शकते. पण भाजपची ही संस्कृती नाही, असा दावा करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आज मात्र आपलीही “संस्कृती” दाखवून दिली. “भ”राची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी “गटाराची” भाषा वापरत प्रत्युत्तर दिले. The language of yesterday’s “bhakara”; The language of the gutters today; The level of both has dropped !!

खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. भाजपवर राऊतांनी केलेले आरोप खोटे आहेत त्यामुळे राऊतांनी एकदा तरी म्हणावे माझी चौकशी करा. रद्दड, खोटे, बेशरमपणे बोलणे, रोज उठल्यानंतर आपले गटार उघडायचे आणि त्यातून गटारगंगा वाहवत ठेवायची हे राऊतांचे धंदे आहेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा आव्हान आहे. संजय राऊतांनी त्यांचे पुरावे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. तसेच जो पाप करतो तोच घाबरतो, तुम्ही आमची चौकशी बिनधास्तपणे करा, असं आव्हान अतुल भातखळकरांनी राऊतांना दिले आहे.अतुल भातखळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राऊतांनी त्यांचे पुरावे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. जर राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग उच्च न्यायालयात पुरावे सादर करा. परंतु वस्तुस्थिती म्हणजे संजय राऊत हे भेदरले आहेत. कारण जो पाप करतो तोच घाबरतो. तुम्ही आमची चौकशी करा.

राऊत आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र नव्हे

ते साधे नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडून आले नाहीत. शिवसेना पक्षाने आमच्या पक्षासोबत युती न केल्यामुळे त्यांना शंभर सुद्दा जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना असे वाटतेय की, त्यांच्या भांडूपचे घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. हा त्यांचा गैरसमज असून महाराष्ट्र म्हणजे राऊत नव्हे, असे म्हणत भातखळकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी राऊतांना खुलं आव्हान देखील दिलं असून ते म्हणाले, महानगरपालिकेची निवडणूक लढवून दाखवा. राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे त्यांनी लक्षात

संजय राऊत आता कंपाऊंडरकडूनही गोळ्या घेत नाहीत. महाराष्ट्र राज्याचे एक इकोनॉमिक ऑफेन्सिस विंग आहे. जर धमक्या दिल्या तर एक्स्टॉरन्शन सेल असतो. त्या एक्स्टॉरन्शन सेलमध्ये ज्यांना कोणालाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्यांनी तक्रार दाखल करावी. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहीजे. परंतु ते हे सर्व काहीही करत नाहीत. कारण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाहीये. यावेळी भातखळकर यांनी सवाल उपस्थितीत करत असेही म्हटले की, आम्ही असं म्हणतो का तक्रार दाखल करू नका, त्यांची चौकशी करू नका, करा ना.. राऊतांच्या माहितीसाठी सांगतो की, राज्यात एक्स्टॉरन्शन सेल आहे, तिथे तक्रार करा. राज्याचे पोलीस मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत आणि गृहमंत्री तर अस्तित्वात नाहीत, त्यामुळे राऊतांनी पोकळ वल्गना करू नये.

त्या आरोपांची माहिती राऊतांनी द्यावी

किरीट सोमय्या भाजपचे एक वरिष्ठ नेते ते माजी आमदार आणि खासदार आहेत. परंतु संजय राऊत ज्या पद्धतीचे आरोप जबाबदार पद्धतीने करत आहेत. त्या आरोपांची माहिती त्यांनी द्यावी. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन भाजपसोबत जोडण्यात येत होते. परंतु त्यासंदर्भातील चौकशीचं काय झालं, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यावं. आर्यन खान प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांनी लाच घेतली. म्हणून एसआयटी नेमली गेली. त्या एसआयटीचे काय झाले? खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आल्यानंतर आत्महत्या केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली होती. त्याला एक वर्ष त्याचे काय झाले?, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

The language of yesterday’s “bhakara”; The language of the gutters today; The level of both has dropped !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी