राज्यात उसाला सर्वाधिक दर कोल्हापुर जिल्ह्यात; पुण्यासह अन्य जिल्ह्यामध्ये मात्र शेतकऱ्यांना ठेंगा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तर सांगली जिल्ह्यातील दोन अशा दहा साखर कारखान्यांनी राज्यात उसाला सर्वाधिक दर दिला. उर्वरित राज्यात मात्र कारखान्यांनी शेतकऱ्यांनाकमी दर देऊन ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे राज्य एक असताना विविध जिल्ह्यात उसाला वेगवेगळे दर का ? असा प्रश्न जनतेत निर्माण होत आहे. The highest rate of sugarcane in the state is in Kolhapur district; In Pune and other districts, however given low price

राज्यात सर्वाधिक प्रतिटन ३१७६ रुपये दर सोनहिरा (कडेगांव-सांगली) कारखान्याने दिला. त्यानंतर कोल्हापुरातील कुंभी कासारी कारखान्याने प्रतिटन ३११९ रुपये दर दिला आहे.

राज्यात सर्वाधिक दर दिलेले कारखाने असे जिल्हा कारखान्याचे नाव प्रत्यक्ष दिलेला दर (प्रतिटन रुपये)सांगली सोनहिरा-कडेगाव ३१७६, कोल्हापूर कुंभी-कुडित्रे ३११९, कोल्हापूर बिद्री-कागल ३०७५,सांगली निनाईदेवी-शिराळा ३०५३, कोल्हापूर पंचगंगा-इचलकरंजी ३०४०, कोल्हापूर ओलम-चंदगड २९८५, कोल्हापूर शाहू-कागल २९७२, कोल्हापूर भोगावती-परिते २९७२, कोल्हापूर कोरे-वारणानगर २९५१, कोल्हापूर गायकवाड-बांबवडे २९०० रुपये.यावर्षी राज्यातील १९० कारखान्यांनी हंगाम घेतला होता. या कारखान्यांचा हंगाम नुकताच संपला. यावर्षी राज्यात १०१२ लाख टन गाळप होऊन १०६.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

मोरारजी देसाई यांच्या काळात साखर स्वस्त

राज्यात साखरेचे विपुल उत्पादन झाले आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील साखरेचे दर कमी करण्याची गरज आहे. अवाढव्य उत्पादन साखर कारखान्यांनी घेतले आहे. या उत्पादनाचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे साखर स्वस्त दरात जनतेला देण्याचे कर्तव्य आता सरकारचे आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळात साखर स्वस्त झाली होती. अर्थात ती त्यांनी केली होती. त्यांचा आदर्श घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘शिराळा शेठ राणा,साखरेच्या गोण्या’, असे म्हणत साखर मोफत जरी वाटता येत नसेल तर साखरेचे दर कमी करण्याचे काम करण्यासाठी पावले उचलावीत. कारण वाढत्या महागाईत हा निर्णय गरजेचा बनला आहे.

शिवशाहीत एकेकाळी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवण्याची घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आता त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री बनले आहेत. ते आता पेट्रोल, डिझेल, साखर याबाबत जनहिताचे कोणते निर्णय घेतात, हे पहायचे आहे. असे म्हणतात शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. पण, सध्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समजकारण, अशा दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे, असे जनहिताचे निर्णय घेत नसल्यामुळे दिसते आहे.

The highest rate of sugarcane in the state is in Kolhapur district; In Pune and other districts, however given low price

महत्त्वाच्या बातम्या