गोडसेनीतीचा महिमा मोदी सरकार आल्यानंतर वाढला नवाब मलिक यांची टिका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गोडसेनीतीचा महिमा वाढवणे, त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार आल्यानंतर देशभरात हळूहळू वाढत चालले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला. The glory of Godse policy increased after the coming of Modi government riticism of Nawab Malik

गुजरात राज्यातील शाळेत नथुराम गोडसे यांच्यावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आल्याच्या व संबंधित शिक्षकावर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर मलिक बोलत होते.आठ वर्षे महात्मा गांधी यांचे नांव घेऊन नुसते कार्यक्रम करायचे. महात्मा गांधी यांचं नाव घेतले नाही तर जग आणि देशभरात राजकारण करता येत नाही हे मोदींना मान्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

गुजरातमध्ये नथुराम गोडसे माझा नायक हा विषय समोर येत असेल तर ते योग्य नाही. आठ वर्षात गोडसेचे महिमामंडन जोरात सुरू आहे ही सत्य परिस्थिती आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

The glory of Godse policy increased after the coming of Modi government riticism of Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण