मंत्र्यांना निधीवाटपावरून महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस


विशेष प्रतिनिधी

नंदुरबार : सत्ताधारी महाविकास आघाडीतच अंतर्गत धुसफूस असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के.सी पाडवी यांची खात्याला मिळत असलेल्या कमी निधीबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे. पाडवी यांच्यासह आणखी एका काँग्रेस मंत्र्याने निधी कमतरतेबाबत पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आहे.Internal rift in Mahavikas Aghadi over allocation of funds to ministers

पाडवी म्हणाले, इतर विभागांना आस्थापना खर्च जनरलच्या बजेटमधून मिळतो तर आदिवासी विकास विभागाला मात्र विकासाच्या निधींमधून हा खर्च करावा लागत आहे. आदिवासी बांधवांचा विकास थांबवून पगार द्यावा लागत आहे. आस्थापना खर्च वाढतच आहे. त्यामुळे आदिवासी खातं फक्त पगार वाटप करणारं खातं म्हणून शिल्लक उरेल.



मला माज्या सरकार विरोधात बोलायचे नाही पण आदिवासी बांधवांच्या विकासाशी निगडीत प्रश्न असल्याने याचा खुलासा करत आहे. केंद्राने लादलेल्या मॅचिंग ग्रँन्ड योजनांना द्यावा लागणारा निधी आणि आदिवासी विकास विभागाच्या विकास योजनांमधून आस्थापनेवर करावा लागणारा खर्च याचा ताळमेळ पाहता आगामी काळात आदिवासी विकास खात फक्त पगार वाटणार खात म्हणून शिल्लक राहिल.

या सर्व गोष्टींबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना अवगत केले असून पक्षनिरीक्षकांच्या माध्यमातून हायकमांडाना देखील या साºया परिस्थितीची कल्पना दिली गेली आहे.कॉँग्रेसच्या मंत्र्यांच्या या नाराजीमुळे काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे.

Internal rift in Mahavikas Aghadi over allocation of funds to ministers

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात