नारायण राणे यांनी मांडली संजय राऊतांची कुंडली, शिवसेना प्रमुखांवर लेख लिहिल्याचेही दिले पुरावे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हा माणूस शिवसेनेत आला कधी? १० मे 1992 साली सामनात संपादक म्हणून आला. तो लोकप्रभामधून आला. त्याआधी मार्मिकमध्ये होता. तिथे हकालपट्टी झाली आणि लोकप्रभाला आला. लोकप्रभात असताना त्यांनी जे पराक्रम केले, त्यांनी त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.Narayan Rane critisised Sanjay Raut, also gave evidence of writing articles on Shiv Sena chief

राणे म्हणाले, माझ्या हातात १० मे १९९२ सालीचा अंक आहे. यात संजय राऊत यांनी बाळासाहेबांबद्दल लिहिलं आहे. त्यांनी लोकप्रभामध्ये छापलं आहे. माझ्याकडे लोकप्रभाचा अंक आहे. संजय राऊतांनी नेमके कुणावर आरोप करायला घेतले होते? पत्रकार परिषदेला राज्यभरातील शिवसेनेचे नेते, मंत्री येणार अशी जाहिरात होती. पण विभागप्रमुख, नेते, मंत्री नव्हते.



नाशिकचे काही मोजके लोकं होती. पक्षप्रमुखही नव्हते. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली ती स्वत: त्यांनी अडचणीत आहे म्हणून पत्रकार परिषद घेतली. एवढे दिवस सेना भवन आठवलं नाही. जसं काही शिवसेना प्रमुख आपणच झालोय अशा आवेशात ते बोलत होते. त्याच पत्रकार परिषदेत ते काय-काय शब्द उच्चारत होते.

एक वृत्तपत्राच्या संपादकाने काय-काय शब्द वापरले. मी तसे शब्द वापरु शकत नाही. पण फक्त एक शब्द वापरतो. आम्ही गां नाही. अरे मी कुठे म्हणालो तसं? हा माणूस शिवसेनेत आला कधी? १० मे 1992 साली सामनात संपादक म्हणून आला. तो लोकप्रभामधून आला. त्याआधी मार्मिकमध्ये होता. तिथे हकालपट्टी झाली आणि लोकप्रभाला आला. लोकप्रभात असताना त्यांनी जे पराक्रम केले, त्यांनी त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले.

हा पत्रकार कसा आहे त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही असे सांगून राणे म्हणाले, सेनाअंतर्गत कलह असल्याबद्दल लिहिलं आहे. संजय राऊत अंतर्गत कशी आग लावता येईले ते पाहत असतो. म्हणून तुमच्यावर मी चिडतो. तुम्ही लाचार पत्रकार. पैशांचा जोर आहे, असं बाळासाहेब ठाकरे राऊत यांना उद्देशून म्हणाले.

संजय राऊत पत्रकार नाही. त्यांची भाष त्या पात्रतेची नाहीच. तुम्ही आरोप करा. बेकार आरोप करता. पण तुम्ही केव्हापासून आरोप करायला लागलात? ते काल अस्वस्थ का झाले? काल त्यांचा थयथयाट का झाला? प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या जबाबानंतर थयथयाट चालू झाला. प्रविण राऊतच्या ईडी मुलाखतीनंतर नेमकं काय झालं? पत्रकार आहेस ना तर पुरावे दे ना. नाहीतर आम्ही सांगतो, तू अलिबागला जमीन घेतली. सुदिप पाटकर कोण? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली डायरेक्टर कशा असू शकतात? असा सवाल राणे यांनी केला.

संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. तर त्यांचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत तिथे आहे. ते शिवसेनेचे नाही तर कदाचित राष्ट्रवादीचा नाही तर पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटव तुलाच मेन करतो आम्ही. कारण उद्धव ठाकरे, जेव्हा पहिल्यावेळी शरद पवार गेले तेव्हा त्यांच्याबरोबर फक्त संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते.

त्यांची पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे. पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे. तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण व्यवहाराबद्दल संपूर्ण मला माहिती आहे. आम्ही का गप्प बसलो आहे. पण तू थेट 300 कोटी घेतले असे वक्तव्य करतो. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये. पुजा करावी आणि चौकशी करावी.

Narayan Rane critisised Sanjay Raut, also gave evidence of writing articles on Shiv Sena chief

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात