मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटी मागणारे चौघे गजाआड, भामट्यांचा बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा


प्रतिनिधी

मुंबई : नव्या शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांना तब्बल ९० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या चौकडीला मुंबई पोलिसांनी गजाआड केले. आमदार राहुल कुल यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून “आपण भाजपच्या एका मोठ्या माणसाच्या संपर्कात असून तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देतो,’ असे आमिष दाखवले.The four who demanded 100 crores to get a ministerial post claim that they are in touch with big leaders of Gajaad, Bhamta

मात्र, कुल यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना देऊन गुन्हा दाखल करून तपास करण्यास सांगितले. त्याप्रमाणे कुल यांनी पोलिसांच्या मदतीने मुंबईतील हॉटेल ओबेरॉयमध्ये सापळा लावून चार आरोपींना जेरबंद केले. या आरोपींनी अशाच प्रकारे चार ते पाच आमदारांना फोन करून मंत्रिपद मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.



आमदार कुल यांचे खासगी सचिव ओंकार थोरात यांच्या मोबाइलवर 17 जुलै रोजी अज्ञात आरोपीने फोन केला. त्याने आपले नाव रियाजभाई सांगितले. ‘मी दिल्लीवरून आलो आहे, मला साहेबांनी मीटिंगची वेळ दुपारी चार वाजता दिली आहे. पण ते फोन उचलत नाहीत. कुठे भेट होईल?’ अशी विचारणा केली. आमदार कुल यांची भेट झाल्यानंतर थोरातांनी रियाजभाई यांचा फोन आला होता, असे सांगितले. त्याने भाजपच्या मोठ्या नेत्याच्या संर्पकात असून महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटी रुपये मागत असल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार कुल यांनी थोरात यांना रियाजला हॉटेल ओबेरॉयमध्ये भेटण्यास बोलावण्यास सांगितले. त्या ठिकाणी येऊन त्याने दीड तास आमदार कुल यांच्याशी चर्चा केली. रियाजने मंत्रिपदासाठी ९० कोटींची मागणी करत त्यापैकी २० टक्के रक्कम म्हणजे १८ कोटी रुपये घेण्याकरिता उद्या येणार आणि उर्वरित पैसे काम झाल्यानंतर द्या, असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी अडकला जाळ्यात

रियाज दुसऱ्या दिवशी हॉटेल ओबेरॉयमधील कॅफेटेरियात १८ कोटी रु. घेण्यास आला. आ. कुल व जयकुमार गोरे हे रियाजला भेटले. त्या वेळी साध्या वेशातील पोलिस हॉटेलमध्ये आले व त्यांनी रियाज शेख याला चौकशीकरिता ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करत द. मुंबईतील नागपाडा येथून योगेश कुलकर्णी (५७), सागर संगवई (३७) आणि जफर अहमद रशीद अहमद उस्मानी यांना उचलले.

इतरही आमदारांना फोन केले : आमदार कुल

आमदार राहुल कुल म्हणाले, दिल्लीतून अनोळखी इसम रियाज याचा फोन आल्यानंतर त्याने कोट्यवधी रुपयांची मागणी करत मंत्रिपदाची ऑफर दिली. त्याच वेळी त्याच्याबाबत संशय आला. त्याने अशाच प्रकारे इतरही काही आमदारांना फोन करून मंत्रिपदाची ऑफर दिली. याबाबतची माहिती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यावर त्यांनी आरोपीला जेरबंद करण्याच्या सूचना मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांना दिल्या. त्यामुळे पैसे घेण्याकरिता रियाज हॉटेलमध्ये आल्यानंतर सापळा रचलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्यास अटक केली आहे. रियाजसोबत फोनवर झालेल्या सर्व संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्ड पुराव्याकामी पोलिसांना सादर करण्यात आले आहे.

The four who demanded 100 crores to get a ministerial post claim that they are in touch with big leaders of Gajaad, Bhamta

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात