फडणवीस सरकार : माध्यमांच्या मंत्रिपदांच्या याद्यांवर विश्वास ठेवू नका; एकनाथ शिंदेंचे ट्विट!!


प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस सरकारच्या पुन्हा येण्याची वाट मोकळी झाल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन करणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर चर्चा केली आहे. तत्पूर्वी, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ कसे असेल अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याआधीच एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं ट्विट करून मंत्रिपदाच्या याद्यांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. Don’t trust media ministerial lists; Eknath Shinde’s tweet

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट

मात्र फडणवीस यांच्या आणि शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण असणार अशी चर्चा रंगली असून मंत्रिपदं, खातेवाटप याविषयी एकनाथ शिंदेंनी ट्विट केले आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिंदेंनी ट्विटर वरून केले आहे.

नव्या सरकारमध्ये मंत्रिमदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदं देण्यात येणार असून वेळेवर बदल केला जाऊ शकतो असेही सांगितले जात आहे. तर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कशा प्रकारे मंत्रिपदं असतील, याबाबत चर्चा सुरू देखील झाल्या आहेत. मात्र याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

माध्यमांची मंत्र्यांची संभाव्य यादी अशी :

कॅबिनेट

देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर

प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे

देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे

विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर

राज्यमंत्री

संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले

Don’t trust media ministerial lists; Eknath Shinde’s tweet

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती