
शनिवारी पुण्याच्या बेलसर गावात झिका विषाणूची पहिली प्रकरणे नोंदवली असून, केरळनंतर केस नोंदवणारे हे दुसरे राज्य ठरले आहे. The first patient of ‘Zika’ was found in Purandar, Pune in the state
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र हा कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावातील व्यक्तिला झिका नावाच्या विषाणुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शनिवारी पुण्याच्या बेलसर गावात झिका विषाणूची पहिली प्रकरणे नोंदवली असून, केरळनंतर केस नोंदवणारे हे दुसरे राज्य ठरले आहे.त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे.
५० वर्षीय महिलेत हा झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील ५० वर्षीय महिलेने शुक्रवारी संक्रमणासाठी सकारात्मक चाचणी केली. या महिलेची चिकनगुनियाची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने बेलसर गावाला भेट देऊन पाहणी केली. “बेलसर गावातील झिका रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि तिला आता कोणतीही लक्षणे नाहीत. राज्य जलद प्रतिसाद पथकाने गावात पाहणीही केली आणि स्थानिक अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक तत्त्वांविषयी माहिती दिली, ” असे डॉ प्रदीप आवटे म्हणाले.
नक्की काय आहे झिका आजार
झिका विषाणु हा १९४७ मध्ये सर्वप्रथम आफ्रिका आणि रशियामध्ये आढळुन आला होता.या व्हायरसपासुन बचाव करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही.अशावेळी स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमेव उपाय आहे.झिका व्हायरस डासांपासून पसरतो.झिका वायुसेनेत ब्राझिलमधील नवजात बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर 20%रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.झिका विषाणू जीव घेणा नसला तरी तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
कशी घ्याल काळजी ?
1) घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
2) घरामध्ये व आजूबाजूच्या परिसरात साठवलेले पाणी जास्त काळ उघडे ठेवू नये.
3) ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरला आहे. तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.
4) झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
5) या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे..
6) घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
7) तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
8)प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
The first patient of ‘Zika’ was found in Purandar, Pune in the state
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांचे शिवसैनिकांना धडे, माज- मस्ती पाहिजे, मवाली-गुंड म्हटले तरी चालेल
- भारत होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष, एम महिन्यासाठी मिळाला मान
- भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?
- पेगॅसस प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यांत सुनावणी