कॉंग्रेसने आंदोलन केले आणि पण मानापमानातून अंतर्गत गटबाजीचे राजकारण रंगले


मुंबईत कॉँग्रेसने इंधन दरवाढ आणि शेतकºयांवरील अत्याचारांविरुध्द आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात मानापमानातून कॉँग्रेसमधील गटबाजीच पुढे आली. मुंबई प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात वाद रंगला. भाई जगताप यांनी आपल्याला जाणून बुजून राजगृहात नेले नाही असे सिद्दीकी म्हणाले.The Congress agitated and but the politics of internal factionalism surfaced


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत कॉँग्रेसने इंधन दरवाढ आणि शेतकऱ्या वरील अत्याचारांविरुध्द आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात मानापमानातून कॉँग्रेसमधील गटबाजीच पुढे आली. मुंबई प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात वाद रंगला. भाई जगताप यांनी आपल्याला जाणून बुजून राजगृहात नेले नाही असे सिद्दीकी म्हणाले.

इंधन दरवाढीसह महिला आणि शेतर्कयांवरील अत्याचारांविरोधात काँग्रेसने पुढील दोन आठवडे आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबईत रविवारी पदयात्रेने त्याची सुरुवात झाली. पण, यावेळी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली.


उध्दव ठाकरेंच्या “लोक जोड्याने मारण्याच्या” भाषेचा काँग्रेसवर परिणाम नाही; भाई जगतापांचा स्वबळाचा पुनरूच्चार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानावरून पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी राजगृहातील प्रवेशावरून गोंधळ झाला. यासंदर्भात मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, राजगृहमधील प्रवेशासाठी पाठविलेल्या यादीत दहा जणांचीच नावे होती. यादी ठरवणारा मी नव्हतो. बाबासाहेबांच्या घरातील मंडळींनी नावे फायनल केली होती. तर मी झिशानला एकट्याला बाबासाहेबांच्या घरी घेऊन जाणार असल्याचे सांगत आमच्यात वाद नसल्याचे भाई जगताप म्हणाले.

या वादावर नाराजी व्यक्त करताना आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले की, दिल्लीतून बारा लोकांची यादी आली होती. ते आत गेले. आम्ही बाहेर आहोत. यात कोणताही वाद झाला नाही. माझा आणि सूरज ठाकूर यांच्यातही वाद झाला नाही. मी मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष, आमदार असूनही माझे यादीत नाव नव्हते. कदाचित त्यांना ते महत्त्वाचे वाटत नसावे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्या कुटुंबाचे जुने संबंध आहेत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले, पण दहा लोकांनाच परवानगी होती, हे त्यांनी नाकारले.

The Congress agitated and but the politics of internal factionalism surfaced

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात