विेशेष प्रतिनिधी
मुंबई : आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लावून घेतली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांचे नाव तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टसाठी सुचविले. त्यानुसार यांची नियुक्ती ट्रस्टी म्हणून करण्यात आली आहे. The character of Milind Narvekar on the Tirumala Tirupati Devasthan Trust planted by the Chief Minister; Shiv Sena’s entry into the south
रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांची आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विविध राज्यांमधून 28 ट्रस्टी या ट्रस्टवर नेमण्यात येतात. या खेरीज 50 निमंत्रित ट्रस्टी सरकार नेमते. मिलिंद नार्वेकर या आपल्या विश्वासू व्यक्तीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून त्या ट्रस्टवर नियुक्ती करून घेतली आहे.
या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिणेतल्या राजकारणात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. या आधी शिवसेनेने बिहारमध्ये निवडणूक लढविली आहे. परंतु नोटा पेक्षाही कमी मते त्या पक्षाला मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांची तिरुपती देवस्थान ट्रस्ट वर वर्णी लावून उद्धव ठाकरे यांनी दक्षिणेतील राज्यांमध्ये चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App