गडचिरोली एन्काऊंटर मधल्या नक्षलवादी कमांडरचा मृतदेह दोन दिवसांनंतर सापडला; डोक्यावर 25 लाखांचे होते इनाम!!


वृत्तसंस्था

गडचिरोली : गडचिरोलीतील ग्यारापत्ती जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाने धडक कारवाई करून 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यापैकी एका मोठ्या नक्षलवादी कमांडरचा मृतदेह दोन दिवसानंतर ग्यारापत्तीच्या जंगलात आढळला आहे. सुखलाल परचाकी असे या नक्षलवादी कमांडरचे नाव असून तेहतीस वर्षांचा होता. त्याच्या डोक्यावर तब्बल 25 लाखांचे इनाम होते.The body of a Naxalite commander in the Gadchiroli encounter was found two days later; The reward was 25 lakhs on the head

सुखलाल परचाकी याचा एन्काऊंटरच्या ठिकाणी मृतदेह सापडल्याने आता महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलवाद विरोधातील या मोहिमेचे महत्त्व किती होते हे ठळकपणे लक्षात येत आहे.मिलिंद तेलतुंबडे या नक्षलवादी कमांडरच्या डोक्यावर तब्बल 50 लाखांचे इनाम होते. त्याची माहिती देणाऱ्याला महाराष्ट्र पोलीस 50 लाखांचे इनाम देणार होते. तो महाराष्ट्र पोलिसांच्या धडक कारवाईत या चकमकीत ठार झाला आहे.

त्याच्या खालोखाल असा नक्षलवादी कमांडर सुखलाल हा देखील ठार झाला होता. आता त्याचा मृतदेह ग्यारापत्तीच्या जंगलात आढळला आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.

The body of a Naxalite commander in the Gadchiroli encounter was found two days later; The reward was 25 lakhs on the head

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था