भाजप आमदाराने मुंडण करून घातले तिघाडी सरकारचे तेरावे

शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी मुंडण करून तेरावे घातले. The BJP MLA mangesh chaved shaved off the thackeray government


विशेष प्रतिनिधी

चाळीसगाव : शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी मुंडण करून तेरावे घातले. ऋषीपांथा (ता.चाळीसगाव) येथे बुधवारी सकाळी य तीन पायाच्या खुर्चीवर तिघाडी सरकारचा फोटो ठेवून सरकारचे श्राध्द घालण्यात आले.वीज वितरण अभियंत्यास खुर्चीला बांधल्याप्रकरणी आमदार चव्हाण हे १२ दिवस अटकेत होते. शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जमावाने महावितरणचे अधीक्षक अभियंता माहेम्मद फारुख मोहम्मद युसूफ यांना खूर्चीत बांधून चपलांचा हार घालून मारहाण केली होती.

या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आमदार चव्हाण यांच्यासह ३१ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

The BJP MLA mangesh chaved shaved off the thackeray government

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*