Fear of blood clots due to AstraZeneca vaccine, Britain prevents ongoing trial on children

ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्यांची भीती, ब्रिटनने लहान मुलांवरील सुरू असलेले परीक्षण रोखले

AstraZeneca vaccine : ब्रिटनने ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे लहान मुलांवर सुरू असलेले परीक्षण रोखले आहे. ही लस बनवण्यात सहकार्य करणाऱ्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने एका जबाबात म्हटलंय की, ब्रिटनच्या औषध नियामक संस्थेने जोपर्यंत लसीच्या वापरामुळे रक्तातील गुठळ्यांच्या शक्यतेचे आकलन होत नाही, तोपर्यंत परीक्षण न करण्याचा निर्णय घेतलाय आहे. यावर त्यांना ब्रिटनची औषधे आणि आरोग्य सेवा नियामक संस्थेकडून अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. Fear of blood clots due to AstraZeneca vaccine, Britain prevents ongoing trial on children


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्रिटनने ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे लहान मुलांवर सुरू असलेले परीक्षण रोखले आहे. ही लस बनवण्यात सहकार्य करणाऱ्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने एका जबाबात म्हटलंय की, ब्रिटनच्या औषध नियामक संस्थेने जोपर्यंत लसीच्या वापरामुळे रक्तातील गुठळ्यांच्या शक्यतेचे आकलन होत नाही, तोपर्यंत परीक्षण न करण्याचा निर्णय घेतलाय आहे. यावर त्यांना ब्रिटनची औषधे आणि आरोग्य सेवा नियामक संस्थेकडून अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्यांची समस्या!

ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर ब्रिटनमध्ये 30 जणांना रक्तात गुठळ्यांचा त्रास झाला होता. यात 7 जणांचा मृत्यूही झालेला आहे. तथापि, ब्रिटनच्या औषध नियामक संस्थेने म्हटलेय की, या लसीच्या धोक्याच्या तुलनेत याचे फायदे जास्त आहेत. पूर्ण जगात अनेक आरोग्य संस्थांची नजर या बाबीवर आहे की, ॲस्ट्राझेनेका लसीमुळे ब्लड क्लॉटिंगची शक्यता किती प्रमाणात आहे. युरोप आणि नॉर्वेमध्ये लसीकरणानंतर रक्तात गुठळ्या झाल्याच्या अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे.

ब्रिटनमध्ये  ॲस्ट्राझेनेका लसीचे 2 कोटी डोस दिले

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 3 कोटींहून जास्त जणांनी कोरोनाची लस घेतलेली आहे. यापैकी तब्बल 1.8 कोटी जणांनी ॲस्ट्राझेनेकाची लस घेतलेली आहे. लस घेतल्यानंतर ब्रिटनमध्ये कोरोनाच्या स्थितीत मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. येथे संक्रमितांच्या संख्येसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही घट झाली आहे.

Fear of blood clots due to AstraZeneca vaccine, Britain prevents ongoing trial on children

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*