माझ्यावर झालेला झालेला हल्ला पूर्वनियोजित, कटात जयंत पाटील, पोलीस अधीक्षकांचा समावेश, आ. गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

The attack on me was pre-planned, including Jayant Patil, Superintendent of Police Serious allegations of Gopichand Padalkar

Gopichand Padalkar : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 7 नोव्हेंबर झालेला माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजीत होता. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक एस. पी. मनिषा डुबुले हे हल्ल्याच्या कटात सामिल होते असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यावेळची एक व्हिडिओ क्लिप दाखवत आमदार पडळकर यांनी हा आरोप केला आहे. The attack on me was pre-planned, including Jayant Patil, Superintendent of Police Serious allegations of Gopichand Padalkar


प्रतिनिधी

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 7 नोव्हेंबर झालेला माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजीत होता. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक एस. पी. मनिषा डुबुले हे हल्ल्याच्या कटात सामिल होते असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यावेळची एक व्हिडिओ क्लिप दाखवत आमदार पडळकर यांनी हा आरोप केला आहे.

आटपाडी येथे 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून मारामारी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये हा राडा झाला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासहित दोन्ही गटातील 10 लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तर राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आम्ही आंदोलन उभे केले आहे त्यामुळेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा प्रतिआरोप त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

ते म्हणाले की, हा जो व्हीडीओ आपण पाहिला दि. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे. सदर हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या दारामध्ये झालेला आहे. आणि आपल्याला दिसलेही असेल की हल्ला किती सुनियोजित होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. आणि मग जमावाकडनं हमला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय. ते ही घटना थांबविण्यापेक्षा चित्रीकरणात मग्न आहेत.

या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे एस.पी दीक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो मी माझा पवार-पाटलांविरुद्धचा लढा सुरूच ठेवणार आहे, असेही ते म्हणाले.

The attack on me was pre-planned, including Jayant Patil, Superintendent of Police Serious allegations of Gopichand Padalkar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती