एकनाथ शिंदे बंड : ठाकरे गटाचे मंत्री उदय सामंत शिंदे गटात सहभागी व्हायला गुवाहाटीत; पण नेमका हेतू काय??

प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत हे महाराष्ट्र मुंबई परिसरात शिवसेनेचे एकापाठोपाठ एक मेळावे घेत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातली आमदारांची गळती थांबायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना ठाकरे गटातील एक मंत्री उदय सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हायला गुवाहाटीला रवाना झाल्याची बातमी आहे. Thackeray’s minister Uday Samant Shinde in Guwahati to join the group

शनिवारीपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या करण्यासाठीच्या बैठकीला उपस्थित राहणारे उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अर्थात उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हायला गेले की तो गट तिथे जाऊन फोडायला गेलेत काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय उदय सामंत हे शिवसेनेचे सध्याचे मंत्री असले तरी ते राष्ट्रवादीतून शिवसेनेचे आले आहेत ही बाब देखील दृष्टीआड करता येणार नाही. त्यामुळे उदय सामंत यांची एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी नेमकी “तयारी” काय आहे?, याविषयी देखील संशय वाढला आहे.शिवसेनेच्या गोटात खळबळ

रविवार सकाळीच उदय सामंत सूरतला गेले होते. त्यानंतर ते गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती असून चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये उदय सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर दिसतेय. रविवारी त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. त्यांच्याशी कित्येकदा फोनवरून दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. तसेच, त्यांच्या काही समर्थकांमध्ये उदय सामंत गुवाहाटीला पोहोचल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेनेला एकच धक्का बसला असून शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली.

Thackeray’s minister Uday Samant Shinde in Guwahati to join the group

महत्वाच्या बातम्या