शिवसेनेचे मंत्री : नाका खालून नऊ गेले; आदित्य आता एकटेच उरले!!


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने गेल्या तीन दिवसांत मुंबईत भरपूर राडा घातला असला तरी प्रत्यक्षात शिवसेनेतील गळती थांबायला तयार नाही शिवसेनेत आता “नाका खालून नऊ गेले आणि आदित्य आता एकटे उरले” अशी स्थिती आलेली आहे. शिवसेनेचे 9 मंत्री एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री एवढेच मंत्रिमंडळातले प्रतिनिधित्व शिवसेनेतील उरले आहे

शिवसैनिकांचा राडा संजय राऊत यांचे बेताल वक्तव्य एवढे असूनही एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ आमदारच नाही अनेक मंत्रीसुद्धा शिंदे गटाला मिळत असून, रविवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या एकूण मंत्र्यांपैकी आता केवळ आदित्य ठाकरे हेच मंत्री म्हणून उरले आहेत.

नऊ मंत्री शिंदे गटात

खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटातले अनेक मंत्री त्यांना जाऊन मिळाले आहेत. रविवारी मंत्री उदय सामंत हे देखील गुवाहटीला रवाना झाल्यामुळे आता शिंदे गटातील एकूण मंत्र्यांची संख्या ही नऊ इतकी झाली आहे. यामुळे आता पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे सोडले तर शिवसेनेचे राज्यातील मंत्रीमंडळ हे आसामला जाऊन बसले आहे. या आमदार आणि मंत्र्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

शिंदे गटातील मंत्री कोण?

  •  एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री
  •  उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
  •  दादा भुसे – कृषी मंत्री
  •  गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्री
  •  संदीपान भुमरे – रोजगार हमी मंत्री
  •  शंभूराज देसाई – गृहराज्य मंत्री
  •  अब्दुल सत्तार – राज्यमंत्री
  •  बच्चू कडू – राज्यमंत्री
  • राजेंद्र यड्रावकर- राज्य आरोग्यमंत्री

Shivsena splits : 9 Shivsena ministers are in eknath shinde camp

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*