टीईटीसाठी तब्बल अडीच लाख अर्ज, येत्या १० ऑक्टोाबरला होणार परीक्षा


विेशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यभरातून दोन लाख ५० हजारांहून अधिक शिक्षक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. TET exam will held on 10 oct.

राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित आदी शाळांमध्ये लवकरच ६१०० नवीन शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भावी शिक्षकांना ही परीक्षा देणे बंधनकारक आहे.



टीईटी पेपर-एक हा १० ऑक्टोेबरला सकाळी १०.३० ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. पेपर-दोन १० ऑक्टोकबरला दुपारी दोन ते सायंकाळी ४.३० या वेळेत ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

राज्यात मागील दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा घेण्यात आली नव्हती. दोन वर्षांनंतर आता ही परीक्षा १० ऑक्टोबरला होणार आहे. परीक्षेसाठी तीन ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर अर्ज करण्याची मुदत २५ ऑगस्टला संपणार आहे.

TET exam will held on 10 oct.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात