तालीबान्यांच्या ताब्यात आहे तब्बल १ ट्रिलीयन डॉलर्सचा खनिजांचा साठा, तांबे, लोखंड, लिथियमसह अनेक खाणी


विशेष प्रतिनिधी

काबूल : अमेरिकेने आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगणिस्थानची खाती गोठवल्यामुळे तालीबान्यांकडे देश चालविण्यासाठी पैसे नाहीत असे म्हटले जाते. परंतु, अफगणिस्थानमध्ये तब्बल १ ट्रिलीयन डॉलर्स किंमतीचा खनिजांचा साठा असून त्यांच्यासाठी ही एक ठेवच असल्याचे म्हटले जात आहे. या खनिज साठ्यातून जगाला अपारंपारिक उर्जेचा अक्षय्य साठा जगाला उपलब्ध होऊ शकतो.Taliban control 1 trillion in minerals, including copper, iron ore, lithium

अफगणिस्थानवर तालीबानने कब्जा केल्यावर अमेरिकेसहित सर्वच देशांनी आर्थिक बंधने घातली आहेत. त्यामुळे तालीबान आर्थिक संकटात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (यूएसजीएस) च्या जानेवारीच्या अहवालानुसार, अफगणिस्थानमध्ये बॉक्साइट, तांबे, लोह खनिज, लिथियम यासारखी दुर्मिळ खनिजे आहेत. त्यावर आता तालीबानचा ताबा आहे.



पॉवर केबल्स बनविण्यासाठी तांब्याचा वापर होतो. याची प्रति टन किंमत १० हजार डॉलर्स इतकी आहे. त्याचबरोाबर इलेक्ट्रिक कार बॅटरी, सौर पॅनेल आणि पवन चक्की बनवण्यासाठी लिथियम हा एक महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनुसार 2040 पर्यंत लिथियमची जागतिक मागणी 40 पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. अफगणिस्थानात लिथियमचा प्रचंड साठा असून आजपर्यंत त्याचा वापर केलाच गेला नाही अशी माहिती द रेअर मेटल्स वॉर पुस्तकाचे लेखक गुइलॉम पिट्रॉन यांनी सांगितले.

अफगाणिस्तानने पन्ना आणि माणिकांसारखे मौल्यवान दगड आहेत. त्याचबरोबर टूमलाइन आणि लापिस लाझुलीच्याही खाणी आहेत. पाकिस्तामध्ये बेकायदेशिर मार्गाने त्यांची तस्करी होत आहे. त्याचबरोबर अफगणिस्थानमध्ये टाल्क, संगमरवरी, कोळसा आणि लोखंडाच्याही खाणी आहेत.

तालिबानकडे या खाणींचा ताबा असल्याने आता परदेशी गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत. मात्र, चीनासारखा देश तालीबानसोबत व्यवसाय करू शकतो. त्यामुळे चीन याठिकाणी गुंतवणूक करू शकतो. त्यामुळेच तालीबान सत्तेवर आल्यावर मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध ठेवण्याची तयारी चीनने दाखविली आहे.

२००७ मध्ये सरकारी मालकीच्या चायना मेटलर्जिकल ग्रुप कॉपोर्रेशनने तांब्याच्या खाणीतून तांबे काढण्यासाठीचे ३० वर्षांचे अधिकार मिळविले आहेत. यातून ११.५ दशलक्ष टन तांबे खाणीतून काढण्यात येणार आहे.चीनच्या ताब्यातील या खाणींचे काम सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. मात्र, परिस्थिती सामान्य झाल्यावर काम सुरू होणार आहे.

वॉशिंग्टनस्थित ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशन थिंक टँकचे वरिष्ठ सहकारी रायन हस यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, चिनी नेते अत्यंत व्यवहारी आहेत. त्यामुळे अफगणिस्थानवर तालीबानने कब्जा मिळविला असला तरी ते व्यावहारिक विचार करून तालीबानशी सहकार्य सुरू ठेवतील.

Taliban control 1 trillion in minerals, including copper, iron ore, lithium

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात