मुंबईत दहशतवाद्यांनी केली होती लोकलचीही टेहळणी, रेल्वेची सुरक्षा यंत्रणा सतर्क


वृत्तसंस्था

मुंबई : दिल्ली येथील विशेष पोलिस पथकाने सहा दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी मुंबई लोकलची टेहळणी केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. Terrorist also watched local trains

देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला. यामध्ये दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली. या कटात पकडलेला एक मुंबईचा रहिवासी असून त्याचे नाव जान मोहम्मद असल्याचे समोर आले. सणासुदीच्या काळात दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत हल्ला करण्याचा कट रचला होता. यामध्ये या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याची माहिती चौकशीनंतर एका दहशतवाद्याने दिली.मुंबईच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह रेल्वे पोलिस आणि इतर सुरक्षा विभाग सतर्क झाले आहेत. जागोजागी तपासणी करणे, श्वान पथक, बॉम्बशोधक आणि निकामी पथकाद्वारे पाहणी सुरू आहे. स्थानकावरील हमाल, बूट पॉलिश करणाऱ्यांना संशंयित हालचाली दिसल्यास माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Terrorist also watched local trains

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण