मुंबईतील दहा बारमालक सलग तीन महिने अनिल देशमुख यांना देत होते चार कोटी रुपयांचा हप्ता, ईडीच्या तपासात झाले उघड


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाली आहे. याच संदर्भात अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीने छापा टाकल्याचे समोर आले आहे.Ten bar owners in Mumbai were paying Rs 4 crore to Anil Deshmukh for three consecutive months, ED probe reveals


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाली आहे. याच संदर्भात अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीने छापा टाकल्याचे समोर आले आहे.

ईडीकडून चार विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.



ईडीकडून अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासोबतच त्यांचे स्वीयसहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या घरावरही छापा टाकला आहे. मुंबईतील बार मालकांकडून अनिल देशमुख यांना रोख रक्कम देण्यात आल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत आणि याच आधारावर ईडीनं छापे टाकले आहेत.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील १० बार मालकांचे जबाब ईडीनं नोंदवले आहेत. पोलीस अधिकाºयांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे.

यात पैशांच्या व्यवहारातील धागेदोरे शोधण्यासाठी ईडीनंही याप्रकरणात उडी घेतली आहे. यातूनच ईडीच्या काही काही धागेदोरे लागले आहेत. मुंबई पोलीसमधून निलंबीत करण्यात आलेल्या सचिन वाझेनं मुंबईतील बार मालकांकडून दरमहा ४० ते ५० लाख रुपये वसुल केल्याचा आरोप आहे.

Ten bar owners in Mumbai were paying Rs 4 crore to Anil Deshmukh for three consecutive months, ED probe reveals

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात