छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


अनुपम यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 


वृत्तसंस्था

मुंबई : छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते अनुपम श्याम यांचे मुंबईत रविवारी रात्री वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.  Television veteran actor Anupam Shyam has died at the age of 63

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.  त्यांनी ट्विटरवर एका भावनिक संदेशाद्वारे शोक व्यक्त केला. अशोक पंडित यांनी लिहिले की, अनुपम श्याम, एक महान अभिनेता आणि एक महान व्यक्ती होते, त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्याच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना.



चित्रपट आणि टीव्ही उद्योगासाठी हे एक मोठे नुकसान आहे. अभिनेता अनुपम श्याम अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून प्रसिद्धीला आले. त्यांनी ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मध्ये ठाकूर सज्जन सिंह म्हणून काम केले.  त्यांच्या इतर लोकप्रिय चित्रपटांमध्ये नायक, दुबई रिटर्न्स, परझानिया, लज्जा, हजारों ख्वाइशें ऐसी, शक्ती: द पॉवर आणि बँडिट क्वीन यांचा समावेश आहे.

2008 मध्ये स्लमडॉग मिलियनेअर या समीक्षकांनी कौतुक केलेल्या चित्रपटात अभिनय केल्याची माहिती बऱ्याच जणांना नाही. यानंतर त्यांनी इतर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केले.

गेल्या वर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  अनुपम श्याम बरे झाल्यानंतर त्यांचे नियमित डायलिसिस होत होते.  या वर्षी म्हणजे 2021 ला जेव्हा ते कामावर परतले होता, तेव्हा ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेचा सीझन 2 सुरू झाला होता.

Television veteran actor Anupam Shyam has died at the age of 63

महत्तवाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात