संजय राऊतांना धमक्या, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला, झेपत नसेल तर गृह मंत्रालय सोडा; पण ईडी कोठडीतल्या गृहमंत्र्यांना ते झेपत होते का??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्या. त्यावर संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिंदे – फडणवीस सरकारचे जोरदार वाभाडे काढले. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोलेवजा सल्ला दिला आहे. पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये दंगली झाल्या आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आणि आता तर संजय राऊत यांना थेट गुंड टोळ्यांनी धमक्या दिल्या आहेत. राज्यात गृह मंत्रालयाचा वचकच नाही. जर गृह मंत्रालय झेपत नसेल तर ते सोडून द्या, असा परखड टोलेवजा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. Supriya sule sule targets devendra Fadanavis over his home ministry

देवेंद्र फडणवीसंना गृह मंत्रालय झेपत नाही, असा गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे. काही विशिष्ट पोलीस अधिकारी फडणवीसांचे ऐकत नाहीत किंवा फडणवीसांच्या ऑर्डर्सना लॅटर अँड स्पिरिटमध्ये फॉलो करत नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षण काही नोकरशहांनी आणि मंत्रालयातल्या काही पत्रकारांनी नोंदविले आहे.

त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या टोलेवजा सल्ल्याची भर पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृह मंत्रालय झेपत नाही. त्यांचा गृहमंत्रालयावर वचक नाही, अशा दिशेने या सगळ्या बातम्या चालल्या आहेत.

याचा अर्थ गृहमंत्रालय आगामी काळात काही महत्त्वाच्या घडामोडी घडवून आणणार आहे का??, महाराष्ट्रातील काही “बडे मासे” खऱ्या अर्थाने कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत का??, हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे!!



 

अनिल देशमुखांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द

पण जर फडणवीसांना महाराष्ट्राचे गृह मंत्रालय झेपत नसेल तर आधीच्या सरकार मधल्या गृहमंत्र्यांना ते मंत्रालय झेपत होते का??, हा खरा प्रश्न आहे. कारण आधीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नंतर दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री होते. अनिल देशमुख यांनी तर कोरोना काळात कायदा मोडणाऱ्यांसाठी पोलिसांच्या काठ्यांना तेल लावून ठेवायला सांगितले होते. पण नंतर 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात त्याच गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तेल ईडी आणि सीबीआयने काढले. तेव्हा अनिल देशमुख यांना गृह मंत्रालय झेपले होते का??, हा प्रश्न तेव्हा सुप्रिया सुळे यांना पडला होता का?? हे खरे प्रश्न आहेत.

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण, सचिन वाझे आणि परमवीर सिंग, संजय पांडे यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना हाताळण्यात राष्ट्रवादीचे गृहमंत्री यशस्वी ठरले, असे म्हणायचे आहे का??

 गृहमंत्री ईडी कोठडीत

पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला. संभाजीनगर मध्ये समाजकंटकांनी दंगल केली या बाबी खऱ्याच आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा हा गंभीर प्रश्न आहे हे खरेच आहे. पण म्हणून लगेच देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नाही, हा निष्कर्ष कसा काढता येऊ शकेल?? त्यावर टोलेवजा सल्ला जरूर देता येऊ शकेल, पण तो निष्कर्ष खराचं असेल, असे कोणत्या आधारावर मानता येईल?? विशेषतः ज्या पक्षाचे गृहमंत्री 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात पदावर असताना ईडीच्या कोठडीत गेले आणि सध्या जामिनावर बाहेर आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांनी फडणवीसांना गृहमंत्रालय झेपत नाही हे म्हणणे कितपत वस्तुस्थितीला धरून आहे??, हा बोचणारा असला तरी खरा प्रश्न आहे!!

Supriya sule sule targets devendra Fadanavis over his home ministry

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात