वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर तोंड उघडले असून महिला अत्याचाराची घटना संतापजनक आणि दुःखद आहे, असे सांगितले आहे. तसेच या घटनेवरून राजकारण करू नये, असा सल्लाही विरोधी पक्षांना दिला आहे.Supriya Sule finally opened her mouth; Said, don’t want politics for Sakinaka incident!
त्या म्हणाल्या, अशा घटनांनंतर चर्चासत्रे होतात, राजकीय आरोप प्रत्यारोप होतात. पण, आता यापुढे अशा घटना होणारच नाहीत, यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे.शासन-प्रशासन, पोलिस यंत्रणा , स्वयंसेवी संस्था , माध्यमे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनता या सर्व घटकांनी एकजुटीने अशा घटना रोखण्यासाठी खंबीर आणि निर्णायक पावले उचलण्याची हीच वेळ आहे, असे त्या म्हणाल्या.
नाशिकमध्ये हैद्राबादच्या ‘SHE टिम’च्या धर्तीवर ‘निर्भया’ पथके गठीत करण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे छुपे कॅमेरे देऊन नराधमांच्या मुसक्या आवळल्या होत्या. हा प्रयोग महाराष्ट्रभर राबविता येणे शक्य आहे. यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची वज्रमुठ केल्यास अशा अपराधांना कायमचा आळा घालणे शक्य होईल.
याशिवाय अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा डेटाबेस तयार करुन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील महिला आणि मुलांसाठी योग्य निवारा आणि पुनर्वसन यालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App