पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष व्यग्र झाले आहेत. शेजारी राज्य गोव्यातील रणनीतीवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, गोव्यात आमचे प्रयत्न होते काँग्रेसला सोबत घेण्याचे, गोव्याच्या वातावरणात कायम नशा असते राजकारणाची. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझे आतापर्यंत वेणुगोपाल, राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे.”State President Chandrakant Patil should prepare for his next election – Sanjay Raut
प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष व्यग्र झाले आहेत. शेजारी राज्य गोव्यातील रणनीतीवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, गोव्यात आमचे प्रयत्न होते काँग्रेसला सोबत घेण्याचे,
गोव्याच्या वातावरणात कायम नशा असते राजकारणाची. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझे आतापर्यंत वेणुगोपाल, राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे.”
ते पुढे म्हणाले की, गोव्याबद्दल माझी आणि प्रफुल्ल पटेल यांची चर्चा होईल. उद्या मला तृणमूल काँग्रेसचे काही नेते भेटणार आहेत. भाजपकडून होत असलेल्या टीकेवर ते म्हणाले की, भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहेत. यावर भाजपनं बोलावं. सीमेवर गंभीर परिस्थिती आहे.
देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येतं का? हे पाहावं लागेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ, निरागस आहेत त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी.
ते पुढे म्हणाले की, कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते. राकेश टिकैत लढाई संपवून घरी गेले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी त्यांना भेटलो. यावेळी सेना यूपीमध्ये 50 जागा लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा या वक्तव्यावर ते म्हणाले की, मराठी पाट्यांचा खर्च द्यायचा की नाही ते आम्ही पाहू. तुम्ही महाराष्ट्रात राहता महाराष्ट्राच्या मातीचे खाता, मराठी मातीचा श्वास घेता,
पण ही वक्तव्य म्हणजे याला बेइमानी म्हणतात. शिवसेनेचा जन्म हा मराठी अस्मितेच्या प्रश्नावर झालाय, ही भाषा दक्षिणेत जाऊन करा. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App