राज्य सरकार कोरोनावर संथ गतीने काम करतंय, केंद्राने काय दिलं नाही लेखी द्या, भारती पवार यांचा सवाल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार करोना काळात संथ गतीने काम करत आहे.State Government is working on Corona at a slow pace, write down what the Center has not given, asks Bharti Pawar

राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिलं नाही याबाबत राज्यातील कुणी मंत्र्याने लेखी द्यावे. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिलं नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असे त्यांनी म्हटले आहे.



डॉ. भारती पवार म्हणाल्या, राज्य सरकार मागतं आणि केंद्र सरकार देत नाही असं राज्यातील कुणी मंत्र्यांनी लेखी दिलं तर मलाही बरं होईल. आम्ही किती निधी दिलाय आणि त्यातील किती निधी राज्यात खर्च झाला हा पण प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारने आयसीयू बेड, ऑक्सिजनची क्षमता, औषधं यासाठी निधी मंजूर केला आहे.

प्रत्येक जिल्ह्याला औषधांचा साठा उपलब्ध पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून देखील औषधांची मागणी करता येते. हे सर्व पाहता राज्य सरकारने किती मागणी केली? त्यानंतरही केंद्राने दिलं नसेल तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून सांगते मला तरी द्या.

राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाही याबाबत आम्हाला आजपर्यंत कुठलंही पत्र मिळालं नाही. उलट आम्ही हे दिलंय आता हे खर्च करा म्हणून सांगत आहे. राज्यात काम चालू आहे. राज्य सरकार काम करत नाही असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतू संथगतीने काम चालू आहे.

आज आपण लवकर काम केले नाही, तर उद्या धावपळ होईल. राज्य सरकारने थोडी गती वाढवावी अशी माझी विनंती आहे,असेही डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.

State Government is working on Corona at a slow pace, write down what the Center has not given, asks Bharti Pawar

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात