भाजपचे महावितरणच्या कार्यालयासमोर ‘हात पंखे वाटप’ आंदोलन; महाविकास आघाडी सरकारने जनतेला वेठीस धरू नये- जगदीश मुळीक


कोळसा टंचाइचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.


विशेष प्रतिनिधी

पुणे -कोळसा टंचाइचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. state government claim the Shortage of coal is not true

विजेचे अघोषित भारनियमन, वाढीव अनामत रक्कम, ग्रामीण भागातील भारनियमन या संदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज शहर भाजपच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना हात पंखे वाटप केले.यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, धनंजय जाधव, प्रमोद कोंढरे प्रशांत हरसुले, चंद्रकांत पोटे, महेश पुंडे, आरती कोंढरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मुळीक पुढे म्हणाले, अघोषित भारनियमनामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबर विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, कर्मचारी यांचे जीवन मेटाकुटीस आले आहे. त्यातच वाढील अनामत रक्कम आकारली जात आहे. भाजपचा वाढीव अनामत रक्कम आकारण्यास तीव्र विरोध आहे. तातडीने विजेचे अघोषित भारनियमन थांबवावे, वीजेच्या अनामत रकमेची वाढीव मागणी रद्द करावी अशी आमची मागणी आहे

state government claim the Shortage of coal is not true

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात