प्रतिनिधी
मुंबई : 2022 च्या दिवाळीत एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीचे बोनस जाहीर झाले असले, तरी सर्वसामान्यांना महागाईला देखील वेगळ्या पद्धतीने तोंड ज्यावेळेस लागत आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटीने 10 % भाडेवाढ केलेली आहे. पण खाजगी ट्रॅव्हल्स वाले मात्र प्रवाशांकडून अक्षरशः तिप्पट भाडेवाढ वसूल करत आहेत. एसटीची भाडेवाढ आज 20 ऑक्टोबर पासून अमलात आली आहे. पण खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची लूट चालवली आहे. ST fares increased by 10%, but private travelers charged three times the fare
खासगी ट्रॅव्हल खासगी ट्रॅव्हल बसने संभाजीनगरहून नागपूरला जाण्यासाठी 1000 हजारऐवजी २४०० ते ४००० रुपये माेजावे लागत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अहमदाबाद आदी शहरांत जाण्यासाठी आगाऊ बुकिंग करावी लागत आहे. आरटीओंच्या नियम आणि अटी, प्रवाशांना तक्रार करण्यासाठी पोर्टल नंबर जाहीर करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातून दिवाळीला बाहेरगावी जाणाऱ्या लाेकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे 60 % बुकिंग आधीच झालेले आहे. ऐन वेळी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण इतर वेळेस पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. तेव्हा झालेला तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ केली जाते, असे ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांनी सांगितले. रेड बस अॅपवर प्रवाशांना ऑनलाइन बुकिंग करता येते. मात्र, नंतर तिकीट रद्द करून पैसे परत घेता येत नाहीत. तसेच हंगामी भाडेवाढीचा भुर्दंड ऐनवेळी सोसावा लागतो.
आरटीओचे प्रवाशांना आवाहन
दिवाळीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कालबाह्य झालेल्या, आरटीओची परवानगी न घेता काही ट्रॅव्हल्स धावत आहेत. प्रवाशांचा विमा उतरवलेला नाही. मोडकळीस आलेल्या बस धोकादायक आहेत. बसच्या सुरक्षेची खात्री करूनच प्रवाशांनी बुकिंग करावे, असे आवाहन आरटीओने केले आहे.
आरटीओकडून दीडपट भाडेवाढीला मान्यता
खासगी बसला एरवी एसटीपेक्षा कमी भाडे घेतलेे जाते. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी दिवाळीत दीडपट भाडेवाढीला आरटीओची मान्यता मिळाली आहे, असे बस ऑनर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी सांगितले. तर प्रत्यक्षात दुप्पट, तिप्पट भाडे का आकारले जाते? २३ ऑक्टोबरला मला नागपूरला जाण्यासाठी एसी बसमध्ये किती भाडे लागेल, अशी तीन ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी २४०० ते ४००० रुपयांपर्यंत भाडे सांगितले.
एसटी बसमध्ये बसून प्रवास करावा लागतो तर आम्ही स्लीपर सेवा देतो. त्यांची आसन क्षमता ४३ ते ४५ आहे. आम्हाला केवळ ३० प्रवासी मिळतात. दिवाळीत आम्हाला नियमाप्रमाणे दीडपट भाडेवाढ मिळते. कुणी अवाजवी भाडे आकारत असेल त्यांनाही समज दिली जाईल. पुणे-नागपूर बसचे भाडे चार हजार आहे. औरंगाबादचा प्रवासी येथून बसला तरी भाडे तेच आकारले जाते. त्यामुळे दर जास्त वाटतात, असे मोहन अमृतकर, सचिव, बस ऑनर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट वेल्फेअर असोसिएशन यांनी म्हटले आहे.
येथे करा तक्रार : एसटीची अचानक केलेली भाडेवाढही नियमबाह्य आहे. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असेल, सेवेत त्रुटी असेल तर asim.human@gmail.com वेबसाइटवर तक्रार करावी, असे आवाहन अॅड. असीम सरोदे यांनी केले आहे. प्रवाशांनी आपले तिकीट जपून ठेवावे. त्याशिवाय तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App