कुणाचे लग्न असेल तर आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे अशी काहींना सवय, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही लोकांना लागली असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.Some people have a habit of taking credit for someone’s marriage and having a child, Devendra Fadnavis targets Shiv Sena

ठाण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना ते म्हणाले,जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा कायदा आमच्या सरकारच्या काळात झाल्याचा दावा करत सर्वजण आता त्याचे श्रेय घेत आहेत.जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासासाठी भाजपा आमदार संजय केळकर यांनीच पाठपुरावा केला होता आणि आमच्या सरकारच्या काळात त्याबाबतचा कायदा तयार करण्यात आला होता. परंतु हा कायदा मंजूर होण्यासाठी एक वषार्चा काळ का लागला?

गेल्या काही दिवसांपासून काही लोक आमच्याच प्रेरणातून कामे झाल्याचे सांगत त्याचे श्रेय घेत आहेत. त्यामुळे कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही जणांना लागल्याची टीका फडणवीस यांनी केली.

आम्ही केवळ शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करतोय आणि अन्यायाविरोधात संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहोत. जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही.

जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मागार्ने चालण्यासाठी आहे.

म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा तुम्ही हा भगव्याचा जो अलख निर्माण केला आहे, हा भगव्याचा अलख पुन्हा एकदा आमच्यातील छत्रपती जागृत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Some people have a habit of taking credit for someone’s marriage and having a child, Devendra Fadnavis targets Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”