वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे करुन नोकरी मिळवली, या प्रकरणी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केलीय.So will 15 crore Muslims get such a job? Wankhede got the job by forging documents; Claim of Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज सकाळी १० वाजता मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्याविरोधात तीन दावे केले आहेत. पहिला दावा हा होता की, एनसीबीने क्रूजवर धाड टाकलीच नाही, दुसरा दावा असा की , त्या क्रूजवर समीर वानखेडे यांचा दाढीवाला मित्र होता तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे तसंच तिसरा दावा असा होता की , वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे करुन नोकरी मिळवली, या प्रकरणी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केलीय.
“माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला देऊन समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एका अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली. गरिब वंचित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात ३ ते ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.”आता जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
जर जात प्रमाणपत्रानुसार अल्पसंख्याक समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर १५ कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.तसच ते म्हणाले की , मी दाखवलेला त्यांचा जात प्रमाणपत्राचा दाखला जर खोटा असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन”, अस देखील नवाब मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App