Exclusive Interview : ‘’…म्हणूनच ठरवलं की आता आपण राजकारणात जायचं’’ तृप्ती देसाईंनी केला खुलासा!

जाणून घ्या, तृप्ती देसाईंनी त्यांच्या विचारांना अनुकल असा कोणता पक्ष वाटतोय?

विशेष प्रतिनिधी

पुणे :  भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ‘द फोकस इंडिया’च्या गप्पाष्टक कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी विविध प्रश्नांवर अगदी त्यांच्या स्वभानुसार बिनधास्त उत्तर दिलं. आतापर्यंत समाजकार्यात दिसणाऱ्या तृप्ती देसाईंनी आता सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले आहे, नुकतच त्यांनी काही दिवसांअगोदर तशी घोषणाही केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण राजकारणात का पदार्पण करत आहोत, याचा त्यांनी गप्पाष्टकच्या विशेष मुलाखतीत स्वत:ला खुलासा केला. शिवाय, त्यांच्या विचारसणीला अनुकूल असा कुठला पक्ष आहे, याचे उत्तरही त्यांनी दिले आहे. So Tripti Desai decided to enter politics

तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘’आतापर्यंत मी सामाजिककार्य केलं. पण अनेकदा जसं  की २०१४, २०१९ च्या निवडणुकीच्या काळात लोकांनी मला राजकारणात जाण्याचा आग्रह केला होता. परंतु मला समाजकार्य फार आवडतं आणि मी अजूनही त्यातच खूप खूश आहे. परंतु, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत किंवा विधानसभेत जाणं फार गरजेचं आहे.’’

याचबरोबर ‘’आपण आता जर सर्वसामान्य लोकांना इतका मोठा न्याय मिळवून देऊ शकतो, तर तिथे गेल्यावर आपण अधिकृतपणे प्रश्न मांडू शकतो. अनेक मागण्या आहेत, महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक मुद्दे आहेत किंवा अनेक कायद्यांमध्ये बदल करणं असेल, हे सभागृहात गेल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही. रस्त्यावर आंदोलन होईल, अनेक ठराव आम्ही दबाव आणून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून मंजूर करून घेऊ. पण कुठंतरी तिथं जाणं गहे गरजेचं आहे आणि म्हणूनच ठरवलं की आता राजकारणात जायचंय. लोकांची इच्छा आहे की, मी कुठून तरी मिळावं. जनतेचं प्रेम मला महाराष्ट्रभर मिळतं आहे. आंदोलनाच्या माध्यमातून मिळालंच परंतु बिग बॉसच्या माध्यमातूनही मिळालं.’’ असंही तृप्ती देसाईंनी सांगितलं.

याशिवाय, ‘’माझ्या विचारसरणीला अनुकूल असा कुठला पक्ष असेल, तर तो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे. जो सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. ज्यामध्ये कधीही धार्मिक मुद्य्यांवरून कुठलेही विषय होत नाहीत.’’ असं म्हणत तृप्ती देसाईंनी प्रश्नाला उत्तर दिलं.

So Tripti Desai decided to enter politics

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात