प्रतिनिधी
बीड : जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली. Sanjay Raut’s tongue slipped over the demonetization that did not happen
रिझर्व्ह बँकेने काल 2000 रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रत्यक्षात या नोटांची कायदेशीर वैधता संपवलेली नाही. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून देण्याचे सुविधा तब्बल 4:15 महिने उपलब्ध करून दिली आहे. तरी देखील ही नोटबंदीच केली आहे, असा दावा करून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वधस्तंभाची भाषा वापरली आहे.
महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी या कथित नोटबंदी वरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले :
लोकांनीच जाहीर फाशीचा कार्यक्रम घ्यावा
8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या. सर्व ठीक होईल. त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास, माझी काही चूक निघल्यास मला भरचौकात फाशी द्या, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.
पण नोटाबंदीचा कोणताही फायदा झालेला नाही. मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेले पाहिजे.
परदेशातून एकही काळा पैसा आला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: वधस्तभांकडे जात देशाचे मी किती नुकसान केले, याची माहिती दिली पाहिजे. नोटाबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, लहान उद्योग, व्यापार बंद पडले. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिली गोष्ट सांगितली होती की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे परदेशातील काळा पैसा देशात येईल. मात्र, गेल्या 6 वर्षांत एक तरी काळा पैसा देशात आला आहे का?
नोटाबंदीनंतरही काश्मिरात दहशतवाद वाढला
नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद्यांना मिळणारा काळा पैसा बंद होईल, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. मात्र, आज काश्मिरात काय स्थितीत आहे, हे पत्रकारांनी जाऊन पहावे. तिथे दहशतवाद वाढला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
प्रत्यक्षात 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणे म्हणजे नोटबंदी नव्हे, तर छोट्या चलनाकडे जाण्याचा तो एक मार्ग आहे. पण हे समजून न घेता संजय राऊत यांनी केवळ नेहमीच्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेतले असे नाही, तर आता थेट त्यांना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App