कोल्हापूरमध्ये भक्तांसाठी तात्पुरता स्कायवॉक बनवण्यात येणार आहे

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: भवानी मंडप आणि छत्रपती शिवाजी चौक या मार्गांवर दर्शन रांगेसाठी बॅरिकेड लावल्यामुळे दुकानदार व भक्तांना बराच त्रास सोसावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी एक तात्पुरता स्कायवॉक भवानी मंडपामध्ये बांधला आहे. त्यामुळे भक्त या स्कायवॉक वरून दर्शनासाठी जाऊ शकतात. तसेच पादचारी आणि दुचाकी चालक हे खालील रस्त्यावरून जा ये करू शकतात.

Skywalk to be built in kolhapur to help devotees

राहुल रेखावर, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक म्हणाले की, “आम्ही या ठिकाणी विधानसभा सदस्य चंद्रकांत जाधव यांच्यासह भेट दिली आणि अधिकाऱ्यांना तात्पुरते स्कायवॉक बांधण्याचे आदेश दिले. यामुळे भक्त आणि व्यापाऱ्यांची सोय झाली आहे. तसेच गुजरी आणि ज्योतिबा रोड वरील जरुरी नसलेले बॅरिकेड्स लवकरच काढण्यात येतील.”


आज रात्री लखिमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये candle march


नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात ऑनलाईन दर्शन पास घेऊन जवळजवळ ३२००० भक्त महालक्ष्मी मंदिरात येऊन गेले. शनिवारी सकाळी ११ वाजता पुढील ३ दिवसांचे बुकिंग सुरू होणार होते. परंतु काही समस्यांमुळे ते ३ वाजता सुरु झाले आणि अर्ध्या तासातच रविवारचे बुकिंग पूर्ण झाले. शनिवारी महालक्ष्मी मूर्तीची पूजा कौमारी मात्रुका या रूपात बांधली होती व देवी मोरावर बसलेली होती. मंदिर पुजारी मयूर मुनीश्वर, सोहम मुनिश्र्वर आणि सुकृत मूनिश्र्वर यांनी सदर पूजा केली.

Skywalk to be built in kolhapur to help devotees

 

महत्त्वाच्या बातम्या