कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची सहा तास साक्ष


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. चौकशी आयोगाने तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.Six-hour testimony of former Commissioner of Police Rashmi Shukla before Koregaon Bhima Inquiry Commission

या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या चौकशीबाबत माहिती देताना रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितले.



 

चौकशी आयोगाचे वकील अ‍ॅड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे.

कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या आजच्या चौकशीविषयी माहिती देताना सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, १ जानेवारी २०१८ ला जेव्हा कोरेगाव भीमाची घटना घडली तेव्ही विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून ते काम करत होते.

त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे असा मागणी अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी केला. त्यावर आयोगाने आदेश केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांना पुराव्याचं प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Six-hour testimony of former Commissioner of Police Rashmi Shukla before Koregaon Bhima Inquiry Commission

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात