Sindhudurg District Bank Election : अवघ्या राज्याचं लक्ष ज्यांनी वेधून घेतलं त्या राणे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार संघर्षाची मेख सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत आहे. दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आता सुरू आहे. 19 जागांपैकी आतापर्यंत भाजपने 10 जिंकून बहुमताचा आकडा गाठला अन् जिल्हा बँकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे. तर महाविकास आघाडीने 7 जागांवर विजय मिळवलाय. यामुळे राणेंनी अखेर एकट्यानेच तिन्ही पक्षांना धूळ चारल्याची चर्चा सुरू झाली आहे. Sindhudurg District Bank Election: BJP rules Sindhudurg District Bank, wins 10 seats, defeats Rane’s Mahavikas Aghadi!
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : अवघ्या राज्याचं लक्ष ज्यांनी वेधून घेतलं त्या राणे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार संघर्षाची मेख सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत आहे. दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आता सुरू आहे. 19 जागांपैकी आतापर्यंत भाजपने 10 जिंकून बहुमताचा आकडा गाठला अन् जिल्हा बँकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे. तर महाविकास आघाडीने 7 जागांवर विजय मिळवलाय. यामुळे राणेंनी अखेर एकट्यानेच तिन्ही पक्षांना धूळ चारल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आतापर्यंत जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीच्या पॅनेलची सत्ता होती. संतोष परब हल्ला प्रकरण आणि प्रचंड आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आता हायकोर्टात अर्ज करणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच नितेश राणे हे अज्ञातवासात आहेत.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले. याचार्च अर्थ या निवडणुकीत तब्बल 98.67 टक्के मतदान झालंय. या मतदारांमध्ये 115 महिला, तर 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. मतदान प्रकिया ही शांततेत पार पडली.
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं पडली. यानंतर ईश्वर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन होते. गतवर्षी बिनविरोध आलेले सतीश सावंत पराभूत झाल्यानं महाविकास आघाडी जबर हादरा बसला आहे. सावंत पराभूत होताच भाजपकडून जारेदार घोषणाबाजी करण्यात आली. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Sindhudurg District Bank Election: BJP rules Sindhudurg District Bank, wins 10 seats, defeats Rane’s Mahavikas Aghadi!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App