शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

एक ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ही माहिती दिली. या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

श्रीपाद छिंदम हा नगरचा माजी महापौर आहे. एका ठेकेदाराला धमकावताना त्याने शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द वापरले होते.त्याची क्लिप व्हायरल झाल्यावर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर छिंदम फरार झाला होता.नंतर पोलिसांनी अटक केली होती.

नगर महापालिकेच्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत छिंदम अपक्ष म्हणून निवडूनही आला होता.2019 ची महापालिका निवडणूक त्याने बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली होती.पण या निवडणुकीत मतदारांनी त्याला धडा शिकवला होता.

Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात