दुकानदार दुकानाचं इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात आणि मराठी नाव छोट्या अक्षरात लिहित होते.Shop boards in the state should be in large letters in Marathi; Approved at the state cabinet meeting
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीत राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.
राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच अनेक दुकानदार मराठीतून पाट्या लावण्याबाबत पळवाटा काढत होते. दुकानदार दुकानाचं इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात आणि मराठी नाव छोट्या अक्षरात लिहित होते. पण आता प्रस्ताव मंजूर झाल्याने दुकानदानदारांना मराठी नावही मोठ्या अक्षरात ठेवावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App