वृत्तसंस्था
पुणे : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पुण्यात तरुणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. झोमॅटोचे म्हणणे आहे की, आरोपी त्यांचा डिलिव्हरी पार्टनर नाही आणि ऑर्डर त्यांच्या अॅपवरून डंझो अॅपमध्ये बदलली गेली आहे. आतापर्यंत, डंझो अॅपने कोणतेही विधान जारी केलेले नाही. एका अॅपवरून दुसऱ्या अॅपमध्ये ऑर्डर कशी बदलली याचा तपास पोलिस करत आहेत.Shocking incident in Pune Zomato delivery boy kissed a girl alone at home, released on bail after arrest
झोमॅटोचे स्पष्टीकरण
झोमॅटोचे म्हणणे आहे की, आरोपी हा त्यांचा डिलिव्हरी पार्टनर नाही, पण गरज पडल्यास आम्ही तपासात मदत करू. आमच्या ग्रुपमध्ये कोणत्याही व्यक्तीला जोडताना आम्ही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन करतो, आमचे झीरो टॉलरन्स धोरण आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना 17 सप्टेंबर रोजी घडली होती. कोंढवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या 19 वर्षीय मुलीने झोमॅटोवरून स्वतःसाठी जेवणाची ऑर्डर दिली होती, पण ही ऑर्डर डन्झो अॅपवर बदलली. यादरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास फूड डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन आला. जेवण दिल्यानंतर 42 वर्षीय रईस शेख याने मुलीला तिच्या पालकांबद्दल विचारले. मुलीने त्याला सांगितले की, ती तिच्या मैत्रिणींसोबत राहते.
जाता जाता म्हणाला – मी तुझ्या काकासारखा
यानंतर त्याने पुन्हा मुलीकडे पाणी मागितले, मुलगी वळताच त्याने तिला मागून पकडले आणि जबरदस्तीने चुंबन घेतले. मुलीने आक्षेप घेतल्यावर तो मागे सरकला, पण जाताना त्याने मुलीला सांगितले की, तो तिच्या काकासारखा आहे. तिला कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकते. काही वेळाने त्याने तरुणीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायला सुरुवात केली. यामुळे मुलगी अस्वस्थ झाली.
पोलिसांनी सांगितले की, तरुणी मित्रासोबत पोलिस ठाण्यात आली आणि तक्रार दाखल केली. पथकाने त्याच रात्री आरोपीला अटक केली. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. आरोपीवर कलम 354 आणि 354A अंतर्गत लैंगिक छळाचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App