Shivsena MLA Chimanrao Patil : राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलीकडेच स्पष्ट केलं होतं की, आम्ही एक वेळ काँग्रेसची माणसं फोडू पण शिवसेनेला हात लावायचा नाही, हे ठरलेलं आहे. परंतु, जळगावात मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेना आमदाराविरुद्ध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी असा दावा केला आहे की, शिवसेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत, तर एक पाय भाजपमध्ये आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नाही, परंतु त्यांच्याच पक्षाच्या आ. चिमणराव पाटलांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवालही त्यांनी केला. Shivsena MLA Chimanrao Patil Likely to Join BJP Claim by NCP Leader Satish Patil In Jalgaon
विशेष प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलीकडेच स्पष्ट केलं होतं की, आम्ही एक वेळ काँग्रेसची माणसं फोडू पण शिवसेनेला हात लावायचा नाही, हे ठरलेलं आहे. परंतु, जळगावात मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेना आमदाराविरुद्ध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी असा दावा केला आहे की, शिवसेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत, तर एक पाय भाजपमध्ये आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नाही, परंतु त्यांच्याच पक्षाच्या आ. चिमणराव पाटलांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे आ. सतीश पाटील रविवारी जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत आ. सतीश पाटलांनी चिमणराव पाटलांवर हल्लाबोल केला. 2014च्या विधानसभेत आपला पराभव घडवण्यात आला, असे चिमणराव म्हणतात. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वृद्धापकाळामुळे चिमणरावांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र आहे. जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा सवाल सतीश पाटलांनी चिमणराव पाटलांना केला आहे.
एकूणच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे असं नाही. जळगावातील धुसफूस आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरू लागली आहे. चिमणराव पाटील आता सतीश पाटलांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तसेच ते खरेच भाजपवासी होणार की काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Shivsena MLA Chimanrao Patil Likely to Join BJP Claim by NCP Leader Satish Patil In Jalgaon
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App