हिंदुत्व कार्ड × धर्मनिरपेक्ष कार्ड : महाविकास आघाडी सरकारच्या अंतिम क्षणी शिवसेना – काँग्रेसचे भांडण??; राष्ट्रवादी नामानिराळी!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यपालांच्या आदेशानुसार ठाकरे सरकारला 30 जून रोजी शक्तिपरीक्षेला विधानसभेत सामोरे जावे लागेल. पण त्याआधी एक प्रयत्न म्हणून ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे तरी देखील सरकार टिकणे अवघड असल्यामुळे भविष्यातले आपले हिंदुत्वाचे कार्ड शाबूत राहावे यासाठी शिवसेना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील जोरदार प्रयत्न करू लागली आहे. Shivsena and Congress may play their own Hindutva and secular cards, but NCP remain aloof

या रणनीतीचा एक भाग म्हणून बुधवारी, २९ जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव शिवसेना मांडणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्यावेळी काँग्रेस त्याला विरोध करणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे कथित धर्मनिरपेक्ष कार्ड शाबूत राहून बहुमत चाचणीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.


Eknath Shinde Vs Sanjay Raut : एकनाथ शिंदे म्हणाले- दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्यांना शिवसेना पाठीशी कशी घालणार?


– काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष कार्ड

एकनाथ शिंदे यांच्या गटाची नाराजी निर्णायक पातळीवर येत असतानाच भाजपाने मंगळवारी, २८ जून रोजी रात्री थेट राज्यपालांना भेटून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्याची सूचना केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला. त्यानंतर बुधवार, २९ जून रोजी सकाळीच राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला, अशा सर्व स्थितीत आता ठाकरे सरकार जाणार हे निश्चित झाले आहे. अशा परिस्थिती ठाकरे सरकारने काही निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेसाठी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा जो शिवसेनेसाठी अडचणीचा ठरला होता, तो मुद्दा निकाली काढून स्वतःचे हिंदुत्व शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नामांतराचा हा प्रस्ताव २९ जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येण्याची चर्चा आहे. मात्र त्याच वेळी या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

– राष्ट्रवादीचे हात वर

सरकार पडणारच आहे, अशा वेळी या नामांतराच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या निधर्मी विचारधारेच्या विरोधात होईल, त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, त्यामुळे काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी काँग्रेसचे नेत्यांनी सिल्वर ओक मधील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत भूमिका मांडली पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत हात वर केले आहेत. पण त्यामुळे बहुमत चाचणीच्या आधीच ठाकरे सरकारमध्ये फूट पडणार आहे, अशी शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी, २९ जून रोजी होणारी ठाकरे सरकारची मंत्रिमंडळाची बैठक शेवटची बैठक असेल, असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.

Shivsena and Congress may play their own Hindutva and secular cards, but NCP remain aloof

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात