गुलाबराव पाटलांचा प्रतिटोला : वेळ आली की संजय राऊतांनाही चुना लावू!!


प्रतिनिधी

मुंबई : गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालावायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटलांनी वेळ आली की संजय राऊत यांना पण चुना लावू, असा राऊतांना प्रतिटोला हाणला आहे. Gulabrao patil targets Sanjay Raut

गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेल येथे बंडखोर आमदारांच्या समोर बोलताना गुलाबराब पाटील म्हणाले, संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू, चूना कसा लावतात हे अजून त्यांना माहिती नाही, वेळ येईल तेव्हा आम्ही संजय राऊतांना चुना लावू, असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.

आमची परिस्थिती नसातानाही आम्ही उद्धव ठाकरेंसाठी भरपूर केले, हे जे मिळाले आहे ते निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने मिळाले आहे. पण आमचाही त्यामध्ये त्याग आहे. आम्ही आमच्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून काम केले आहे. आम्ही आयत्या बिळावर नागोबावाले नाहीत, संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू, चूना कसा लावतात, हे त्यांना माहिती नाही अजून, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही संजय राऊतांना चुना लावू, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

आमचा जीवनातील संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाही. ९२ च्या दंगलीत मी, दोन भाऊ आणि माझे वडील तुरूंगात होतो, तेव्हा राऊत कुठे होते, कलम ५६, ३०२ काय असते हे राऊतांना माहित नाही. रस्त्यावर पायी चालणं काय असतं हे त्यांना माहित नाही, ते आम्ही भोगलंय. हे फक्त बाळा साहेबांचा फोटो लावून मोठे झालेले चित्र आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहोत. सभागृहातील डिबेटमध्ये ३९ आणि ११-१२ अपक्ष हे त्यांच्यासाठी पुरेसे आहोत. त्यांनी वर्षा सोडली, त्यांनी आमदारांना सोडलं पण ते शरद पवारांना सोडण्यास तयार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Gulabrao patil targets Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात