२८ एकरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क आता दिव्यांच्या रोषणाईत न्हावून निघणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे अविभाज्य भाग असलेल्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आता आकर्षक रोषणाईने उजळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून एक कोटी २४ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. Shivaji Park will decorated with lights

मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह इतर पुतळे आणि शिल्पांनाही रोषणाई करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या सी रामचंद्र चौकपासून वसंत देसाई चौकापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यामध्ये विविध रंगांचे आकाशकंदील, डेकोरेटिव्ह बोलार्ड, एलईडी लाईट्स, विविध रंगांचे फ्लड लाईट, गोबो प्रोजक्शन लाईट, भूमिगत लाईट व मशाल लाईट लावण्याचे काम केले जाणार आहे.

हे मैदान २८ एकर परिसरात पसरले असून त्याचा बाह्य परिघ सुमारे १.२ किलोमीटरचा आहे. या मैदानाच्या पदपथावर आकर्षक रोषणाई करण्यासाठी आवश्यक असणारा निधी वापरण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. लवकरच हे काम सुरू होणार आहे.

Shivaji Park will decorated with lights

महत्त्वाच्या बातम्या