“सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली”; मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या युतीमुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही यात उडी घेतली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत बोचरी टीका केली आहे. Shiv Sena’s Thackeray group in alliance with Sambhaji Brigade

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट करुन शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीवर हल्ला चढवला आहे. सत्तेविनी मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली, असे खोचक ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर टीका केली आहे.

– उद्धव ठाकरेंकडून युतीची घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 26 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा केली. आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकणारच आहोत. पण खांद्याला खांदा मिळून निवडणूकही लढणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. याच मुद्यावर मनसेने टीकास्त्र सोडले आहे.

Shiv Sena’s Thackeray group in alliance with Sambhaji Brigade

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!