पीएम केअर फंडात खूप पैसा पडून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, संजय राऊत यांची मागणी


शेतकऱ्यांच्या हट्टासमोर अखेर केंद्रातील मोदी सरकारला निर्णय बदलावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. 18 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हे कायदे आणण्यात आले, मात्र काही शेतकऱ्यांना त्याचे फायदे समजावून सांगण्यात सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. हे कृषी कायदे मागे घेण्यात आले. मात्र, हे कायदे रद्द व्हावेत यासाठी झालेल्या शेतकरी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी केली जात आहे. आज (21 नोव्हेंबर, रविवार) पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.Shiv sena mp sanjay raut demands pm narendra modi to help the families of the farmers who die for anti agricultural law agitation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतकऱ्यांच्या हट्टासमोर अखेर केंद्रातील मोदी सरकारला निर्णय बदलावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. 18 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हे कायदे आणण्यात आले, मात्र काही शेतकऱ्यांना त्याचे फायदे समजावून सांगण्यात सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. हे कृषी कायदे मागे घेण्यात आले. मात्र, हे कायदे रद्द व्हावेत यासाठी झालेल्या शेतकरी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी केली जात आहे. आज (21 नोव्हेंबर, रविवार) पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.



संजय राऊत म्हणाले, “शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. अशी मागणी देशभरातून होत आहे. गेल्या दीड वर्षात सुमारे 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी काही सिंघू सीमेवर, काही गाझीपूर सीमेवर तर काही पोलिसांच्या गोळ्यांनी मरण पावले. हे तिन्ही शेतीविषयक कायद्यांच्या विरोधात लढत होते. पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेतले. सरकारला आपली चूक समजली. पण या चुकीची शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागली. शेतकरी कुटुंबे अडचणीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी त्यांना मदत करावी.

‘पंतप्रधान मोदी सहृदय, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करतील’

संजय राऊत म्हणाले, “पीएम केअर्स फंडात खूप पैसा पडून आहे. त्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करता येईल. शेतकऱ्यांची आणि देशाची माफी मागून चालणार नाही. त्या 700 कुटुंबांना आधार देणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की पंतप्रधान दयाळू आहेत. ते मदत करतील.”

दरम्यान, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर. राव (CSR) यांनी शनिवारी शेतकरी आंदोलनात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय, KCR यांनी केंद्र सरकारकडे अशा कुटुंबांसाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Shiv sena mp sanjay raut demands pm narendra modi to help the families of the farmers who die for anti agricultural law agitation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात